स्फोटकांच्या गुन्ह्यांबाबत NIA तपास करणार, मनसुख हिरेन मृत्यू व कार चोरीप्रकरणी ATS चा तपास

स्फोटकांच्या गुन्ह्यांबाबत NIA तपास करणार, मनसुख हिरेन मृत्यू व कार चोरीप्रकरणी ATS चा तपास

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी आता राष्ट्रीय तपास पथक (NIA) तपास करणार आहे, स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या व स्कॉर्पिओ चोरीप्रकरणातील गुन्ह्याचा तपास मात्र दहशतवाद विरोधी पथकच (एटीएस) करणार आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया निवासस्थानजवळ 25 फेब्रुवारीला पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओमधून 20 जीलेटीन कांड्या सापडल्या होत्या. त्यात अडीच किलो जीलेटीन होते. पण ते कुढल्याही स्फोटक डीव्हीईला जोडण्यात न आल्यामुळे धोकादायक नव्हते. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 286, 465, 473, 506(2)120(ब) तसेच स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.

स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार NIA याप्रकरणी तपास करणार आहे. NIA देशातील घातपातांच्या व दहशतवादी कारवायांबाबत तपास करणारी केंद्रीय यंत्रणा आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणवीस यांनी यापूर्वीच हा तपास एनआयएला देण्याची मागणी केली होती. याबाबत एनआयएमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची पत्नी विमन हिरेन यांच्या तक्रारीवरून एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गृहविभागाच्या आदेशानंतर मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरण एटीएसला वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी एटीएसने विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 302, 201, 34 व 120(ब) अंतर्गत हत्या, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचे सर्व कागदपत्रे एटीएसने मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात घेतले. याशिवाय विक्रोळी येथे मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओ चोरीप्रकरणी दाखल केलेला गुन्ह्यांबाबतही एटीएस तपास करणार आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. जेव्हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला तेव्हा त्यांच्या तोंडात 5 ते 6 रुमाल कोंबलेले होते. मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात फसलेल्या अवस्थेत होता. खाडीच्या बाजूला रेल्वे ब्रिजचे काम चालू आहे. या ब्रिजचे कामावरील सुपरवायझर वाघमारे नावाचे हे किनाऱ्यावर लघुशंका करण्यासाठी गेले असता. त्यांना प्रथम हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली. 

mukesh ambani bomb scare case will be handled by NIA and mansukh death case will be handled by ATS

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com