Mukesh Ambani Threat | मुकेश अंबानींना धमकी; तपासात समोर आलं अफजल गुरू कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

relinace mukesh ambani
मुकेश अंबानींना धमकी; तपासात समोर आलं अफजल गुरू कनेक्शन

मुकेश अंबानींना धमकी; तपासात समोर आलं अफजल गुरू कनेक्शन

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना काल धमकीवजा फोन आला होता. या प्रकरणात धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: 3 तासांत खात्मा करणार...अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी

या प्रकरणात आरोपी विष्णू भोमिक याला दहिसर परिसरातून पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात त्याने अफजल नावाने धमकी दिल्याचे समोर आले होते. मात्र चौकशीत विष्णूने घेतलेले नाव हे एक दहशतवाद्याचे होते. हा दहशतवादी म्हणजे अफजलगुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर भारतातले उद्योगपती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सुरक्षाही पुरवली जाते. विष्णूने या अफजल गुरूचे नाव का वापरले, त्याची पार्श्वभूमी पोलीस तपासत आहेत. अँटिलिया प्रकरणानंतर आता अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे.

हेही वाचा: अंबानींना धमकी देणारा ताब्यात; पोलिसांनी काही तासांतच केलं जेरबंद

कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली, त्यानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. सूत्रांनी सांगितले की, एकूण 8 धमकीचे कॉल आले होते. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी काल देण्यात आली होती.

Web Title: Mukesh Ambani Death Threat Mumbai Police Arrested Accused Afzal Guru

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..