म्हणून बनावट नंबर प्लेट प्रकरणी CIU अधिकाऱ्यांची होतेय चौकशी

म्हणून बनावट नंबर प्लेट प्रकरणी CIU अधिकाऱ्यांची होतेय चौकशी

मुंबई:  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कार आणि संशयित इनोव्हा कारसाठी बनावट नंबर प्लेटचा वापर करण्यात आला होता. याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी ठाण्याच्या दुकानातून बनावट नंबर प्लेट बनवल्या, ते पुरावे म्हणून वाझे ATSकडे सोपावत होते. मात्र हे पुरावे पंचनाम्यात निदर्शनास न आल्याने ATS ने स्विकारले नाही. हे नंबरप्लेट आणण्यासाठी वाझेंच्या सांगण्यावरून CIU चे अधिकारी गेले होते.

त्यामुळेच CIU च्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जात असून त्यांना NIA साक्षीदार बनवण्याच्या प्रयत्नात आहे.  या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, NIA ने मुंबई पोलिस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बनावट नंबर प्लेट प्रकरणी दोघांची चौकशी

नंबरप्लेट बनवणाऱ्यांची ओळख पटली असून याप्रकरणी चेंबूर आणि ठाण्यातील दोघांना चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलं. याप्रकरणी ठाण्यातून एका दुकान मालकाची चौकशी करण्यात आली. याशिवाय चेंबूर येथील ही एकाची चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

कारचा क्रमांक बदलून या कटात ती वापरण्यात आल्याचा संशय आहे. पण सीसीटीव्हीच्या तपासणीत कारचा डॅशबोर्ड, समोरच्या बाजूची विशिष्ठ बनावट आदी गोष्टींच्या सहाय्याने या कारचा शोध लावण्यात आला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण घटनाक्रम पडताळण्यात आल्यानंतर एनआयए मुंबई पोलिसांची सीआययू वापरत असलेल्या या संशयित कारपर्यंत पोहोचले. ही कार आणि त्याची लॉगशीट ताब्यात घेण्यात आले. 

त्या संबंधीत चालकांचीही एनआयएने चौकशी केली. घटनेच्या दिवशी 25 फेब्रुवारीला ही इनोव्हा गाडी ठाण्यात नेण्यात आली होती. त्यानंतर तिचा क्रमांक बदलून पुन्हा मुंबईत आणल्याचा एनआयएला संशय आहे. त्यानंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठविले होते. या सर्व माहितीची एनआयए लॉगशीटच्या मदतीने तपासणी करत आहे. याशिवाय स्कॉर्पिओ कारमध्येही काही बनावट नंबर प्लेक सापडल्या आहेत. याशिवाय या स्कॉर्पिओला लावण्यात आलेल्या नंबरप्लेट ही बनावट होती. तिला निता अंबानी यांच्या पायलट कारचा क्रमांक देण्यात आला होता.

 Mukesh Ambani fake number plate case interrogated CIU Officer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com