मुकेश अंबानींचा नातू घेणार स्वदेशी शिक्षण; 'या' शाळेत घेतला प्रवेश

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पहिल्या नातवाच्या शाळेचा पहिला दिवस कसा होता, याची उत्सुकता आता संपली आहे.
Pruthwi ambani
Pruthwi ambaniSakal

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पहिल्या नातवाच्या शाळेचा पहिला दिवस कसा होता, याची उत्सुकता आता संपली आहे. मुकेश अंबानी यांचा पहिला नातू पृथ्वी हा भारतातच मुंबईतल्या मलबार हिल येथील सनफ्लॉवर स्कूल या शाळेत शिकणार आहे. आकाश आणि श्लोका यांचे शिक्षणही याच शाळेत झाले असल्याने संपूर्ण कुटुंबाने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

या शाळेत पृथ्वी याला उत्तम, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणात शिक्षण मिळेल, अशी अंबानी कुटुबियांना खात्री आहे. पृथ्वीच्या शाळेतील पहिल्या दिवसासाठी थेट अंबानी परिवारातील सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. आकाश आणि श्लोका शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पृथ्वीच्या सोबत गेले.

Pruthwi ambani
मुस्लिम लोकसंख्येवर कंगनाची तिखट प्रतिक्रिया, म्हणाली...

पृथ्वीने पहिल्या दिवशी त्याच्या अंगणवाडीतील इतर विद्यार्थ्यांसोबत पहिला दिवस घालवला. पहिल्या दिवशी सर्वांचा एकमेकांशी परिचय करून देण्यात आला. पृथ्वीने सामान्य माणसाप्रमाणे जीवन व्यतीत करावे, अशी अंबानी परिवाराची इच्छा आहे. परंतु आशियातील सर्वांत श्रीमंत आसामीचा नातू आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या केंद्रस्थानी असलेल्या पृथ्वीला ते कितपत शक्य होते, याबाबत सर्वजण उत्सुक आहेत. अंबानी यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर पृथ्वीचा उल्लेख 'प्रिन्स ऑफ इंडिया' असाही करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com