
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली.
मुंबई: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जवळ मिळून आलेल्या संशयास्पद गाडीमध्ये वीस जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गांभीर्याने चौकशी करून संबंधित प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती माहिती मिळत आहे.
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.
स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अंबानीच्या बंगल्याजवळ जिलेटिनं भरलेली कार
मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने जिलेटीनच्या कांड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या आहेत.
अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयितरित्या उभी करण्यात आली होती. संध्याकाळी या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. पण स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जिलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते. याप्रकरणी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
हिरव्या रंगाची ही कार दुपारपासून उभे होती. बराच काळ ही स्कॉर्पिओ तेथे उभी असल्यामुळे परिसरात विचारण्यात आले. पण तेथे ती कार कोणाचीच नसल्यामुळे अखेर स्थानिक गावदेवी पोलिसांना कारची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. बॉम्ब शोधक पथकांच्या श्वानांनी त्यात संशयास्पद स्फोटके असल्याचे संदेश दिल्यानंतर खबरदारी घेऊन त्या जिलेटीन बाहेर काढण्यात आल्या. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. याशिवाय राज्य दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. ते ही याप्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत. जिलेटीन पुढील परिक्षणासाठी लवकरच न्यायवैधक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. सध्या पोलिस या कारबाबत माहिती घेत आहेत. प्राथमिक पडताळणीत शांतता भंग करण्यासाठी अथवा घाबरवण्यासाठी हा प्रकार केल्याचा प्रकार वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑस्कर आणि मोतीने शोधली जिलेटीन
संशयास्पद कारची तपासणी करण्यासाठी ज्यावेळी स्थानिक गावदेवी पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलावण्यात आले. त्यावेळी घटनास्थळी श्वान पथकातील ऑस्कर आणि मोती या दोन लॅब्रेडोर जातीच्या श्वानांना पाचारण करण्यात आले. दोघांनीही कार जवळ गेल्यानंतर त्यांच्या ट्रेनरला कारमध्ये स्फोटके असल्याचे संकेत खाली बसून दिले. त्यानंतर परिसर खाली करण्यात आला. बॉम्ब सूट घातलेल्या बॉम्ब नाशक पथकाच्या जवानाने जीव जोखमीत घालून जिलेटीनच्या 20 कांड्या बाहेर काढल्या.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mukesh Ambani house Antilia Security heightened gelatin sticks threat letter