esakal | Mukesh Ambani: 'त्या' स्फोटकांमागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात? 

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani: 'त्या' स्फोटकांमागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात? }

मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. या सर्व कटामागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात आहे का? अशा अँगलनं तपास सुरु करण्यात आला आहे.

mumbai
Mukesh Ambani: 'त्या' स्फोटकांमागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात? 
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:   रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाच्या मदतीने जिलेटीनच्या कांड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या. यासोबत मुकेश अंबानी यांना धमकीचं पत्र देखील आलं आहे. मात्र या सर्व कटामागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात आहे का? अशा अँगलनं तपास सुरु करण्यात आला आहे.

२०१३ साली इंडियन मुझाहिद्दीनने अंबानी यांच्या कार्यालयात फॅक्सद्वारे पत्र पाठवले होते. त्यामध्ये देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अंबानींच्या सुरक्षेत वाढ करत झेड प्लस ही सुरक्षा अंबानी यांना देण्यात आली.

हेही वाचा- संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला, विदर्भातले शिवसैनिक एकवटणार

त्यामुळे मुंबई पोलिस या कटामागे  इंडियन मुझाहिद्दीनचा हात आहे का या अँगलही तपास करत आहेत. २०१३ साली मरीन ड्राईव्ह येथील रिलायन्सच्या कार्यालयात एक फॅक्स आला होता. त्याद्वारे ही धमकी देण्यात आली होती.

मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र जशाच्या तसं

ये तो सिर्फ ट्रेलर है

निता भाभी मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है! 
अअगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे पुरेसा मे लिखो उडाने के लिए . इंतजाम हो गया है!

संभल जाना

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.  गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.

Mukesh Ambani house explosives Indian Mujahideen behind the plan mumbai police