esakal | Mukesh Ambani: CCTVमध्ये आढळलेली इनोव्हा कार थांबली होती 'या' टोलनाक्यावर

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani: CCTVमध्ये आढळलेली इनोव्हा कार थांबली होती 'या' टोलनाक्यावर}

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. पोलिसांच्या सीसीटीव्हीत त्या गाडी बरोबरच एक इनोव्हा कार देखील निदर्शनास आली होती.

Mukesh Ambani: CCTVमध्ये आढळलेली इनोव्हा कार थांबली होती 'या' टोलनाक्यावर
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी गुरुवारी रात्री आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या सीसीटीव्हीत त्या गाडी बरोबरच एक इनोव्हा कार देखील निदर्शनास आली होती. ही कार ठाण्यातून मुंबईत आली होती. मुंबईच्या प्रियदर्शनी सिग्नलजवळ स्कॉर्पिओ कार त्या गाडीसोबत निघाली. 

पोलिसांना स्कॉर्पिओ कारचा पत्ता तर लागला मात्र हत्या किंवा कारचा शोध हा अद्याप सुरूच आहे. फोटो ठेवल्यानंतर ही इनोव्हा कारमध्ये रात्री तीन वाजता ठाण्याच्या टोल नाक्यावर पाहायला मिळाली. ठाणे ते टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये ही इनोव्हा कार आपल्याला पाहायला मिळत आहे. या कारचा पत्ता अद्याप लागलेला नसून पोलिस त्या गाडीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा- पुन्हा सक्रिय झाला कोरोना, मुंबईतही सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र जशाच्या तसं

ये तो सिर्फ ट्रेलर है

निता भाभी मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है! 
अअगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे पुरेसा मे लिखो उडाने के लिए . इंतजाम हो गया है!

संभल जाना

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.  गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.

Mukesh Ambani Innova car found on CCTV was parked at Thane toll plaza