मुकेश अंबानी ठरलेत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! जागतिक क्रमवारीतही पटकावले हे स्थान

मुकेश अंबानी ठरलेत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! जागतिक क्रमवारीतही पटकावले हे स्थान


मुंबई : रिलायंस उद्योगसमूहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी  जगातिल अब्जाधिशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महत्वाचे म्हणजे अंबानी यांनी जगातिल सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती आता 70.1 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.  

हुश्श...अखेर निळजे रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला! अवघ्या 15 दिवसात 'एमएसआरडीसी'ने केली पुलाची दुरुस्ती
 
लॉकडाऊनच्या काळात म्हणजे केवळ 53 दिवसात रिलांयस उद्योगसमूहाला संपुर्ण कर्जमुक्त करणाऱ्या मुकेश अंबानी यांनी मोठी झेप घेतली आहे. फोर्बच्या 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी यांनी सातव्या क्रमांक मिळवला आहे. यासोबत मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत वॉरेन बऱे, गूगलचे लॅरी पेड, सर्जी ब्रिन यांना मागे सोडले आहे. अंबानी यांच्या जिओ प्लटफॉर्ममध्ये  जगातिल अनेक बड्या कंपन्यानी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.  जून महिन्यात मुकेश अंबानी या यादीमध्ये नवव्या स्थानावर होते.  मात्र या काळात अंबानी यांच्या संपत्तीत 5.4 अब्ज डॉलर एवढी वाढ झाली आहे. 

फोर्बच्या अब्जाधिशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत.तर दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बर्नाड ऑनौल्ट कुटुब ;तर चवथ्या क्रमाक फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी पटकावला आहे. मायक्रोसॉफ्टचे स्टिव बाल्मर पाचव्या तर सॉफ्टवेअरचे संचालक लॅरी इलिसन हे सहाव्या क्रमांकावर आहेत.

फोर्बच्या यादीतील ठळक वैशिष्टे 

1. पहिल्या 10 अब्जाधिशांच्या यादीत आठजण अमेरिकन आहेत
2. केवळ फ्रांस आणि भारताच्या व्यक्तींनी या यादीत स्थान मिळवलय
3. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या चार सस्थापकांचा यादीत समावेश 
4. यादीत 6 अब्जाधिश हे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी संबधित आहे.
5.  यादीत 36 वर्षाचे मार्क झुकेरबर्ग हे सर्वात तरुण अब्जाधिश आहेत
6. तर उद्योगपती वॉरेन बफे हे 90 वर्षाचे आहे
7. अमेझॉनचे जेफ बेजोस यांनी पहिले स्थान टिकवून ठेवले आहे.

 
जगातिल टॉप 10 अब्जाधिश. 

1.जेफ बेजोस, अँमेझॉन
एकुण संपत्ती- 189.2 अब्ज डॉलर

2.  बिल गेस्ट, मायक्रोसॉफ्ट
एकुण संपत्ती- 111.1 अब्ज डॉलर

3. बर्नाड ऑनौल्ट, LVMH उद्योग समुह
एकुण संपत्ती -109.3 अब्ज डॉलर

4. मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्ट
एकुण संपत्ती -90.2 अब्ज डॉलर

5. स्टीम बाल्मर, मायक्रोसॉफ्ट
एकुण संपत्ती – 74.3 अब्ज डॉलर

6. लैरी एलिसन, सॉफ्टवेअर
एकुण संपत्ती -73.7 अब्ज डॉलर

7. मुकेश अंबानी , रिलायंस  उद्योगसमूह
एकुण संपत्ती -70.1 अब्ज डॉलर

8. वॉरेन बफे , बर्कशायर हाथवे
एकुण संपत्ती -69.1 अब्ज डॉलर

9. लैरी पेज – संस्थापक , गूगल 
एकुण संपत्ती -68.7 अब्ज डॉलर

10. सर्जी ब्रिन, संस्थापक, गूगल
एकुण संपत्ती- 66.9 अब्ज डॉलर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com