NIAची पंचतारांकित हॉटेलमध्ये शोधमोहिम, गुन्ह्यात 14 सिमकार्डचा वापर

NIAची पंचतारांकित हॉटेलमध्ये शोधमोहिम, गुन्ह्यात 14 सिमकार्डचा वापर

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) पंचतारांकीत हॉटेलमध्ये शोध मोहिम राबवली. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 14 सिमकार्ड पुरवणाऱ्या एकाला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे.  सचिन वाझे यांची सीआययूमध्ये नेमणूक झाल्यानंतर ते ठाणे येथील घरी न जाता,  दक्षिण मुंबईतील पंचतारांकित मुक्काम करायचे. या ठिकाणाहून सचिन वाझे सीआययू तसेच सर्व कारवाईची सूत्रे हालवत असल्याचे समोर आले आहे. तसेच अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवण्याचा कट देखील याच ठिकाणी शिजला असून, या ठिकाणी सचिन वाझे यांना अनेक जण भेटल्याची माहिती एनआयएला समजली आहे. त्यानुसार, एनआयएच्या एका पथकाने या हॉटेलमध्ये शोधमोहिम राबवली. मोठ्या प्रमाणात शोधमोहिम हाती घेतली आहे. या ठिकाणी हॉटेल मॅनेजर तसेच कर्मचारी यांच्याकडूनही याप्रकरणी माहिती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच येथील सीसीटीव्ही फुटेजची एनआयएने तपासणी केली आहे. वाझे यांना हॉटेलमध्ये नेमके कोण-कोण भेटायला येत होते, याबाबत एनआयए तपास करत आहे.

तर दुसरीकडे एनआयएचे एक पथक ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या घरी गेले होते. या ठिकाणी हिरेन यांच्या कुटुंबियांची चौकशी करत, त्यांचा लॅपटॉप देखील ताब्यात घेतला. या ठिकाणी देखील हिरेन यांच्या कुटुबियांनी वाझे यांच्यावरच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा ठपका ठेवला आहे. त्याचप्रमाणे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा गुंता सोडविला असल्याचा दावा करणा-या राज्य एटीएसने यामध्ये 10 जणांवर संशय असून, यातील काही संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  साडेतीन तास मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली. त्यांच्या घरातून एनआयएने काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. याशिवाय, एटीएसने आरोपी विनायक शिंदे याला सचिन वाझे यांचे निवासस्थान आणि रेती बंदरच्या परिसरात नेले होते. क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी आरोपीला या दोन्ही ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

तर एटीएसचे एक पथक तपासासाठी गुजरातला दाखल झाले.  त्यासंदर्भात एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी ठाणे येथील कार्यालयात बैठक घेत, पथकाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, एक प्रथक गुजरातला रवाना झाले होते. त्यांनी या प्रकरणात 14 सिमकार्ड पुरवणा-या व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मनसुख हिरेन यांना 4 तारखेला रात्री 8.20 वाजता एक व्हॉट्सअॅप कॉल आला होता. मनसुख यांना आलेला हा शेवटचा कॉल होता. फोन करणाऱ्याने त्यांना तो गुन्हे अन्वेषण विभागाचा अधिकारी तावडे असल्याचं म्हटलं होतं आणि त्याने तावडेंना भेटायला बोलावलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करताना एटीएसने पूर्ण कॉल डेटा काढला. मात्र तरीही पोलिसांना काहीच लीड मिळत नव्हती. मनसुख हिरेन यांच्या फोनमधील सर्व कॉल डिलीट करण्यात आले होते. एटीएसने या सर्व कॉलची डिटेल्स काढली. मात्र त्यांच्या काहीच हाती लागले नाही. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप कॉलची डिटेल्स रिट्रीव्ह करण्यात आली. तेव्हा काही नंबर एटीएसच्या हाती लागले. मात्र त्यातील मनसुख यांना आलेला शेवटचा व्हॉट्सअॅप कॉल एटीएसला खटकत होता. त्यानंतर या नंबरची डिटेल्स काढण्यात आली. तेव्हा या कॉलचं कनेक्शन अहमदाबादशी असल्याचं दिसून आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा- Corona Virus: मुंबईत तब्बल 4 हजारहून अधिक मजले सील

गृहमंत्र्यांच्या अक्षम्य चुका झाल्यामुळे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याच्या वक्त्याव्यामुळे दुखावलेल्यामुळे  परमबीर सिंग यांनी तक्रारीचे पत्र लिहिल्याचे बोलले जात आहे. सचिन वाझे यांनी शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट लपवून ठेवली, तसेच एनआयएकडे चौकशीला जाण्यापूर्वी परमबीर सिंग यांना सचिन वाझे परमबीर यांना भेटले, असेही सूत्रांनी सांगितले. त्यावेळी परमबीर यांनी सुसाइड स्टेटसबद्दल ही झापले होते. दरम्यान, एनआयएकडून परमबीर यांना अद्यापपर्यंत कोणताही समन्स, नोटीस किंवा फोन आला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच याप्रकरणानंतर राजीनामा देण्याचा परमबीर सिंग यांचा कोणताही विचार नसून या पत्रामागे कोणतेही राजकारण, षडयंत्र नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून सिंग यांनी हे पत्र लिहिलं नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
 
मनसुख हिरेनचे भावासोबतचे संभाषण

विनोद- झोप झाली का? काय झाले?
मनसुख- माझा जबाब नोंदवून घेतला. आता पुन्हा जावे लागणार नाही.
विनोद- जबाबात काय लिहून घेतले, ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितलंस ना?
मनसुख- नाही, मी जबाबात तसं म्हटलं नाही.
विनोद- का नाही सांगितलस?
मनसुख- सचिन वाझे यांनी सांगितलं होतं की, ती गाडी मी चालवतो, हे कोणालाही सांगू नकोस. त्यामुळे मी जबाब नोंदवताना तशी माहिती दिली नाही.
विनोद- तू ही गोष्ट चुकीची केलीस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना?
मनसुख- काही नाही होणार, हे प्रकरण साहेबांकडेच आहे.
विनोद- एटीएसचे पथकही चौकशी करताना तुला माहिती विचारेल.
मनसुख- साहेबांकडे (सचिन वाझे) सर्व पेपर आहेत. साहेबच प्रमुख आहेत, आता पुढे काही होणार नाही.
-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mukesh Ambani NIA search operation five star hotel in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com