Corona Virus: मुंबईत तब्बल 4 हजारहून अधिक मजले सील

Corona Virus: मुंबईत तब्बल 4 हजारहून अधिक मजले सील

मुंबई: मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून यात चाळी आणि झोपडट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने इमारतींवर अधिक लक्ष वेधले असून येथे नियमांची कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत 4746 मजले तर 302 इमारती सील करण्यात आल्या. दरम्यान, चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या तुलनेने कमी आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुरुवातीला दाटीवाटीच्या चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले होते. यात  आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग झपाटयाने पसरला होता. तसेच  कुर्ला, वरळी कोळीवाडा, मानखुर्द, गोवंडीसारख्या भागात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने ही ठिकाणे ‘कोरोना हॉटस्पॉट’ जाहीर करण्यात आली. दाटीवाटीचा भाग असल्याने येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेसमोर आव्हान उभे राहिले होते. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, यामध्ये चाळी-झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

यावर बोलताना पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागच्या वर्षी इमारती सोसायट्यांमधील नागरिक घराबाहेर पडले नव्हते. या वेळी मात्र विरुद्ध स्थिती निर्माण झाली. चाळ सदृश्य झोपडपट्यांमधील नागरिक कोरोना बाबत अधिक सावध झाले आहेत. सध्या मुंबईतील रूग्ण दुपटीचा वेग 106 दिवसांवर आहे. रूग्ण वाढत आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona virus last few days 4 thousand 746 floors 302 buildings sealed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com