Mumabi Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवून देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Police

Mumabi Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवून देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Mumabi Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवून देण्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

या धमकीनंतर मुंबई विमानतळासह शहरातील अति महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली होती.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीच्या कॉल प्रकरणी पोलिसांनी एका २५ वर्षीय तरूणाच्या मुसक्या आवळल्या आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरातून या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) फोनवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते.

धमकी देताना कॉलरने स्वत:ची ओळख इरफान अहमद शेख आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य म्हणून दिली होती. या धमकीनंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

त्यानंतर आता ही धमकी देणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही धमकी त्याने कुणाच्या सांगण्यावरून दिली होती. तसेच धमकी देण्यामागे कोणती संघटना आहे याची चौकशी पोलीस करत आहेत.