सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई; पण पोलिसांना सहकार्य करणार: प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकरesakal

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक मजूर घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानंतर दरेकरांना आज पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता प्रवीण दरेकर यांनी या कारवाईबाबत आपण पोलिसांना सर्वप्रकारचं सहकार्य करणार असल्याचं सांगितलंय. आम्ही कुठेही आक्रस्ताळेपणा करणार नाही, पोलिसांना सर्व मदत करणार आहोत. सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असून माझ्यावर कारवाई करण्यासाठी तपासयंत्रणांवर दबाव आहे. मात्र, आम्ही आमच्या भूमिकेवरुन ढळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. (Pravin Darekar)

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकरांना मुंबै बँक प्रकरण भोवणार? पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

'सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई'

पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्यापूर्वी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, सरकार सूडबुद्धीने एकतर्फी कारवाई करत आहे. मविआ नेत्यांवरही गुन्हे दाखल असून त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? ज्या दिवशी मी सभासद झालो तेंव्हा मी मजूर होतो, अंगमेहनतीची कामे करत होतो. नंतर मजूरांनी आर्थिक दृष्ट्या संपन्न होऊ नये का, विकास करु नये का? अशी यांची इच्छा आहे. माथाडी नेते अनेक आहेत. शेवटी जस्टीफिकेशन याबाबत कुणाला देणार? त्यांनी पूर्वग्रहदुषितपणानेच कारवाई करायचं ठरवलं असेल तर त्यांना काय बोलणार? फक्त भाजपच्या नेत्यांवर कारवाई करुन जेरीस आणायचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही आमच्या भूमिकेवरुन ढळणार नाही. मी तपासयंत्रणांना दोष देणार नाहीये.

पुढे ते म्हणाले की, आपल्या नेत्याला चौकशीला बोलावल्यानंतर कार्यकर्त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. पण कुठेही गडबड-गोंधळ होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. राज्यातले अनेक गुन्ह्यांमध्ये मविआतील नेत्यांचा सहभाग आहे, त्याचीही मी माहिती दिली आहे. पण हे सरकार एककल्लीपणाने कारभार करत आहे. सरकार पोलिसांचा वापर दबावाबासाठी करत आहे. आपल्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत, त्यांना अटक करायची नाही, असा प्रकार सुरु आहे.

प्रवीण दरेकर
शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले - देवेंद्र फडणवीस

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबै बँक निवडणुकीसाठी प्रवीण दरेकरांनी मजूर कोट्यातून अर्ज दाखल केला होता. ते ज्या त्या मजूर संस्थेतून निवडून गेले, त्या संस्थेचं पदही बोगस असल्याचे आरोप झाले. यानंतर सहकार खात्याने दरेकरांना नोटीस पाठवली होती. तसेच तक्रार दाखल करण्यात आल्याने आता दरेकरांना रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com