मुंबई : राज्यात दोन दिवसात 11 हजार घरांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : राज्यात दोन दिवसात 11 हजार घरांची विक्री

मुंबई : कोरोना नियंत्रणात येऊ लागला असून आता घर खरेदीला सुगीचे दिवस आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यात 1 लाख 6 हजार 831 तर मुंबईमध्ये 8 हजार 586 घरांची विक्री झाली आहे. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या दोन दिवसात राज्यात 11 हजार 138 आणि मुंबईमध्ये 1 हजार 65 घरांची विक्री झाली आहे.

राज्य सरकारकडून कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत लागू केली होती. या कालावधीतही मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. सरकारने दिलेली सवलत संपुष्ठात आली तरीही राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल वाढत चालली आहे. नवीन गृहप्रकल्पांप्रमाणेच घरांची खरेदी-विक्रीचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आलेल्या माहितीवरून दिसत आहे.

हेही वाचा: समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस - उद्धव ठाकरे

राज्यात ऑक्टोबरमध्ये 1 लाख 6 हजार 831 घरांची विक्री झाली आहे. मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत मोठा महसूलही जमा झाला आहे. राज्यातील घरविक्रींपैकी 8 हजार 586 घरे ही मुंबईतील आहेत. गेल्या महिन्यात घर खरेदी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असतानाच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशीच राज्यात 11 हजार 138 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये 1 हजार 65 घरे मुंबईतील आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक विकासकांनी नवीन प्रकल्पांची घोषणा केली असून ग्राहकांना काही सवलतीही देऊ केल्या आहेत. यामुळे नोव्हेंबर महिन्यात घर विक्रीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: Mumbai 11000 Houses Sold In The State In Two Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbaibdd chawl
go to top