मुंबईत गेल्या 24 तासात 1350 कोरोनाबाधितांची भर; आकडा पुन्हा वाढल्याने चिंतेत भर

मिलिंद तांबे
Thursday, 27 August 2020

मुंबईत आज 1,350 नवे कोरोनारुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,40,882 झाली आहे. मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,532 वर पोहोचला आहे. तर, आज 834 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.          

मुंबई : मुंबईत आज 1,350 नवे कोरोनारुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,40,882 झाली आहे. मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,532 वर पोहोचला आहे. तर, आज 834 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.                                                

भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू; पुनर्विकासाचा वादात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच

मुंबईत आज नोंद झालेल्या 30 मृत्यूंपैकी 27 जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 19 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 30 रुग्णांपैकी एकाचे वय 40 हून कमी होते. 21 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. तर 8 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते.                   

मुंबईत आतापर्यंत 1,13,577 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 86 दिवसांवर गेला आहे. तर 26 ऑगस्टपर्यंत एकूण 7,34,619  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या.  20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट  दरम्यान रुग्णवाढीचा दर हा 0.81 टक्के इतका आहे. 

...अन्यथा जेईई - नीट परीक्षांच्या ॲडमिट कार्डची होळी आणि परीक्षा उधळून लावण्याचा एनएसयुआय इशारा

557 कंटेन्मेंट झोन
मुंबईत 557 वस्त्या आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,738 असून गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 7,257 संशयित आढळले आहेत.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai, 1350 corona patient in the last 24 hours; Add to the anxiety as the numbers rise again