esakal | ऑनलाइन वर्गात शिक्षिकेकडेपाहून मुलाची अश्लील कृती, मुंबईतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Online Class

ऑनलाइन वर्ग सुरु असताना शिक्षिकेकडेपाहून मुलाची अश्लील कृती

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला (minor boy) ताब्यात घेतले आहे. या मुलाच्या वर्तनामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. सध्या कोरोनामुळे शैक्षणिक संस्था (education institutes) सुरु झालेल्या नाहीत. सर्वत्र ऑनलाइन शिकवणी (online classes) वर्ग चालू आहेत. केजीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. अशा या ऑनलाइन वर्गामध्ये काही मुलं अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करतात. (Mumbai 15 year old boy detained for doing obscene act during online classes)

मुंबईत अशीच एक घटना घडली आहे. ऑनलाइन वर्ग सुरु असताना एक १५ वर्षाचा मुलगा शिक्षिकेकडे पाहून अश्लील वर्तन करत होता. बनावट नंबर आणि ई-मेल अ‍ॅड्रेसवरुन त्याने लॉगइन केले होते. १५ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान शिक्षिक नववीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिकवणी वर्ग घेत होती. त्यावेळी हा मुलगा सतत शिक्षिकेकडे पाहून अश्लील कृती करत होता, असे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन मैत्री

"शिक्षिका या मुलाचा चेहरा पाहू शकत नव्हती. पण हा अल्पवयीन मुलगा सतत लॉग इन करुन गुन्हा करत होता. हा प्रकार थांबवण्यासाठी त्या शिक्षिकेने अखेर पोलिसांशी संपर्क साधला" असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आयपी अ‍ॅड्रेसवरुन पोलिसांनी त्याला शोधून काढले व राजस्थान जैसलमेरमधून ताब्यात घेतले. ऑनलाइन वर्ग सुरु असताना तू असं अश्लील वर्तन का करायचास? असं आम्ही त्या मुलाला विचारलं, तेव्हा त्याने आपण हे मजा म्हणून करत असल्याचे उत्तर तपासकर्त्यांना दिले.

loading image
go to top