मुंबईत पुन्हा कहर वाढला; गेल्या 24 तासात 1,735 नव्या रुग्णांची भर; वाचा सविस्तर

मिलिंद तांबे
Saturday, 5 September 2020

मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढत असून शनिवारी (ता. 5) कोरोनाचे 1,735 नवे रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढत असून शनिवारी (ता. 5) कोरोनाचे 1,735 नवे रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,53,712 झाली आहे. मुंबईत आज 33 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,829 वर पोचला आहे. मुंबईत आज 896 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे.

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

मुंबईत शनिवारी 896 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,22,567 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 73 दिवसांवर गेला आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,13,035 चाचण्या करण्यात आल्या. तर 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान रुग्णवाढीचा दर हा 0.96 इतका आहे. 

सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

24 तासांत 8584 अतिजोखमीतील रुग्ण
मुंबईत 551 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,797 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 8,584 अतिजोखमीचे रुग्ण आहेत, तर 2,216 रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Mumbai 1,735 new patients added in last 24 hours; Read detailed