मुंबईत पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला

मुंबईत पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला

मुंबईः  मुंबई शहरात पावसाळी आजारामुळे मृतांच्या आकड्यात घट झाल्याची माहिती समोर आली आहे.  २०२० मध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या पावसाळी आजाराने १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. २०१६ ते २०१९ या गेल्या चार वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये पावसाळी आजाराने मृत्यूंची संख्येत घट झाल्याचं समजतंय. तर २०१९ मध्ये मलेरियामुळे एकही मृत्यू झाला नाही.

२०२० मध्ये मलेरियाचे ४ हजार ९४८ रुग्ण आढळून आले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. लेप्टोच्या २४० रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या १२८ रुग्णांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला होता. 

२०२० मध्ये पावसाळी आजाराने एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये मलेरियाचे १२,  तर २०१७ मध्ये ६, २०१८ मध्ये ३ तर २०२० मध्ये १ मृत्यू झाला होता. मात्र २०१९ मध्ये मलेरियाचे ४ हजार ३५७ रुग्ण सापडले. त्यावर्षात एकही  रुग्ण मलेरियामुळे दगावला नाही.

२०१६ मध्ये मलेरियाने १२, लेप्टोने ९, डेंग्यूने ७ तर हेपटायसिस २ अशा एकूण ३० जणांचा मृत्यू झाला होता.  २०१७ मध्ये मलेरियाने ६, लेप्टोने ७, डेंग्यूने १७ हेपटायसिस २ तर एच१ एन १ ने १८ अशा एकूण ५० जणांचा मृत्यू झाला होता.

२०१८ मध्ये मलेरियाने ३, लेप्टोने १२, डेंग्यूने १४ अशा एकूण २९ जणांचा मृत्यू झाला होता.  २०१९ मध्ये लेप्टोने ११, डेंग्यूने ३, हेपटायसिस १ तर एच१ एन १ ने ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियाने १, लेप्टोने ८, डेंग्यूने ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 Mumbai 2020 Death toll monsoon dropped 12 deaths reported malaria

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com