कोरोना रोखण्यासाठी मायानगरी 24 तास सुरू राहणार? वाचा ही भन्नाट आयडिया...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

कोरोना महामारीचे आव्हान परतवून लावायचे आहे, त्याचवेळी अर्थव्यवस्थाही सुरळीत करायची हे दुहेरी आव्हान आहे. या परिस्थितीत मुंबई कधीही झोपत नाही, ती सतत धावत असते हे प्रत्यक्षात आणण्याचा विचार होत आहे

 

मुंबई ः कोरोना महामारीचे आव्हान परतवून लावायचे आहे, त्याचवेळी अर्थव्यवस्थाही सुरळीत करायची हे दुहेरी आव्हान आहे. या परिस्थितीत मुंबई कधीही झोपत नाही, ती सतत धावत असते हे प्रत्यक्षात आणण्याचा विचार होत आहे. 

संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

मुंबईतील सर्व कार्यालये सुरु करायची असतील, त्याचवेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील गर्दी कमी करायची असेल, तर वर्किंग फ्रॉम होमबरोबरच कार्यालयीन कामाच्या स्वरुपात बदल करण्याचीही आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे कामाच्या वेळा बदलत्या ठेवण्याबरोबरच साप्ताहीक सुटीचा दिवस लवचिक ठेवण्याबाबत विचार होत आहे.

मुंबईतील कामकाज सुरु ठेवायचे असेल, तर दिवसातील 24 तास, आठवड्याचे सातही दिवस काम सुरु ठेवायला हवे. अर्थात सर्वच कार्यालयातील लोकांनी शिफ्टमध्ये काम केले. कामाच्या तीन शिफ्ट केल्या, साप्ताहिक सुटीचा दिवस बदलता ठेवला तर कार्यालयात सहज सुरक्षित अंतर ठेवता येईल. त्यासाठी आता पाच दिवसांचा आठवडा, सहा दिवसांचा आठवडा, ठरलेल्या साप्ताहिक सुटी ही संकल्पना विसरावी लागेल, असाही विचार होत आहे. 

प्लाझ्मा थेरेपी ठरतेय गुणकारी; नायर रुग्णालयातून तब्बल 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त...

कार्यालयात सुरक्षित अंतर जपण्यापेक्षाही उपनगरी रेल्वे तसेच प्रवासी बसमध्ये आव्हान जास्त असेल. उपनगरी रेल्वेची क्षमता दोन हजार प्रवाशांची असते, पण त्यातून प्रसंगी सहा हजार जण प्रवास करतात. या परिस्थितीत सुरक्षित अंतर कसे राखले जाईल. कामाच्या वेळा बदलल्या तर उपनगरी रेल्वेमधील गर्दी कमी होईल. उपनगरी रेल्वेचे आधिकारी कित्येक महिन्यांपासून यासाठी आग्रही आहेत. आता कोरोना महामारीचा यशस्वीपणे सामना करताना या उपायांचा गांभिर्याने विचार होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai 24x7 offices shifts cm advisor on way ahead for mumbai