Mumbai News: मुंबईकरांचा ३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत पार, तीन महत्त्वाचे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले; कसे आहेत मार्ग?

Mumbai 3 Major Flyovers Opening: मुंबईत तीन महत्त्वाचे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
Mumbai 3 Major Flyovers Opening

Mumbai 3 Major Flyovers Opening

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी (ता. २२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com