
Mumbai: पावणे MIDC मध्ये आग; 9 कंपन्या जळून खाक
नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून ही आग वाढत जाऊन तब्बल 9 कंपन्यांना लागली असल्याची माहिती मिळत आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या कंपनीत ही आग लागली असून या आगीमध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
(Mumbai Chemical Company Fire Accident)
ज्या कंपनीत आग लागली आहे त्या कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्या खाली करण्यात आल्या असून त्यातील कामगारांना बाहेर काढण्यात आलं होतं. ही आग अजून आटोक्यात आली नसून भीषण रुप धारण करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ही आग आता शेजारील नऊ कंपन्यामध्ये पसरली असून अग्निशमन दलाकडून शेजारच्या कंपन्यांना आग लागू नये म्हणून कुलिंग प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. यातील 9 कंपन्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्यामध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे आग विझवायला अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे.
MIDC फायर ब्रिगेडसहित, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथून अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खाजगी कंपन्याकडून फोम देखील मागवण्यात आले आहेत. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा: असं वाटतंय की इंग्रज बरे होते - संजय राऊत
पावणे एमआयडीसीमधील (MIDC) ही केमिकल कंपनी असून ही आग इतकी भीषण आहे की या आगीमुळे आकाशात धूराचे लोट पसरलेले आपल्याला पहायला मिळत आहेत. तसेच कंपनीतील वरच्या भागात ४ ते ५ कामगार अडकले असल्याची माहिती मिळत असून त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान ही आग सर्वप्रथम रबर कंपनीला लागली होती त्यानंतर आग वाढत ती केमिकल कंपनीला लागली आणि पसरत आता ती नऊ कंपन्याला लागली आहे. त्यातील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
Web Title: Mumbai A Fire Accident Waste Fly Polycab Chemical Company Fire Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..