
असं वाटतंय की इंग्रज बरे होते - संजय राऊत
मुंबई : मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर खूप सभा होत असतात आणि अशाच सभा तेथे होणार आहेत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी सभा घेतली म्हणून शिवसेना सभा घेत नाही असा टोला त्यांनी लावला आहे.
(Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Sabha)
दरम्यान शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. उत्तरप्रदेशच्या एका खासदाराने राज ठाकरे यांना धमकी दिली आहे त्यावर महाराष्ट्रात आम्ही काहीही बोलणार नाही, कारण राज ठाकरे यांच्यावर चर्चा करण्याला अर्थ नाही असं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: इस्त्राईलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अज्ञातांकडून गोळीबार; 3 ठार
सध्या राज्यात दिलासा घोटाळा सुरू असून गुन्हे फक्त आमच्यावरच सिद्ध होतात बाकीच्यावर का नाही होत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र नवलानी आणि इतर लोकांवर ज्याप्रकराचे आरोप आहेत त्यावर केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत असे ते म्हणाले.
तसेच राणा दाम्पत्याला तुरूंगात ज्या प्रकारची वागणूक मिळाली ते पाहून इंग्रजांचा काळ आठवतो असं किरीट सोमय्या म्हणाले होते त्यावर "ज्याप्रकारची राजवट सध्या देशात सुरू आहे ते पाहून असं वाटतंय की इंग्रज बरे होते." असा टोला राऊतांनी सोमय्या यांना लावला आहे.
हेही वाचा: 'आमच्यात थोडे मतभेद आहेत पण मनभेद नाही' : वसंत मोरे
गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर बोलताना त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत, "आपला पूर्वइतिहास तपासून आपण राजकारणावर बोलायला हवं. आपल्यावर कुठे किती गुन्हे दाखल आहेत हे तपासायला हवं. उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला." असं ते म्हणाले आहेत.
Web Title: Sanjay Raut Uddhav Thackeray Sabha Aurangabad Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..