Mumbai: कल्याण जंक्शन स्थानकात रेल्वेखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू !
kalyan railway stationsakal

Mumbai Local: कल्याण जंक्शन स्थानकात रेल्वेखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू !

kalyan Latest Update: कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली
Published on

Latest Dombivali News: कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या मेल एक्सप्रेस मध्ये चढत असताना तोल गेल्याने एक्सप्रेस आणि प्लॅटफॉर्म मधील गॅप मध्ये पडला. तेवढ्यात एक्स्प्रेस सुरू झाल्याने त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिपिन कुमार सिंह (वय 25) असे या मयत प्रवाशाचे नाव आहे.

Mumbai: कल्याण जंक्शन स्थानकात रेल्वेखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू !
MP Kalyan Kale: सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणार, डॉ.कल्याण काळेंनी दिली मतदारांना ग्वाही

मुंबई येथे फिरण्यासाठी बिपीन हा आला होता. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वरून त्याने धुळे एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याचा पाय अचानक पायऱ्यांवरून सरकला आणि मधल्या गॅप मध्ये सापडला. तेवढयात एक्सप्रेस चालू झाल्याने बिपीन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे करीत आहेत.

Mumbai: कल्याण जंक्शन स्थानकात रेल्वेखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू !
Kalyan Railway: कल्याण स्टेशन परिसराची परिस्थिती सुधाणार? खासदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com