
Mumbai: पार्किंगच्या वादातून सुरू झालेल्या मानसिक छळाला कंटाळून दीपक पिहाल (४५) या रिक्षाचालकाने शनिवारी (ता. १४) रात्री मुलुंड कॉलनी येथील राहत्या घरी आत्महत्या केली. घरासमोरील मोकळ्या जागेत दीपक रिक्षा पार्क करीत असे; मात्र शेजारी राहणाऱ्या विजय जेठवा या व्यक्तीने अन्य रहिवाशांच्या सह्या घेत तेथे पायऱ्या बांधून घेतल्या.