esakal | 'लकडी मे जीव होता है!', मोदीजी मग आरे कॉलनीत काय झालं?
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai aarey Netizens on PM Modi Told Bear Grylls how he cares about Forests

मुंबई : मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत होत असलेल्या वृक्षतोडीला विरोध केला जातोय. सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तसेच, सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आलीय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही घेरण्यात आलंय. 

'लकडी मे जीव होता है!', मोदीजी मग आरे कॉलनीत काय झालं?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत होत असलेल्या वृक्षतोडीला विरोध केला जातोय. सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तसेच, सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आलीय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही घेरण्यात आलंय. 

वृक्षतोडीविरोधात आंदोलन
मुंबईत आरे कॉलनीतील जंगल तोडण्याचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा घेण्यात येत आहे. वृक्षतोडीला रोखण्यासाठी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावण्यात आल्या त्यानंतर गेल्या दोन दिवसांत  झाडे तोडण्याचे कामही सुरू झाले आहे. पर्यावरणप्रेमी आणि मुंबईतील अनेक संघटनांनी या वृक्षतोडीला विरोध करत आंदोलन छेडले आहे. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर या विषयावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील चुकलेले नाही.

मोदींचा काय संबंध?
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेयर ग्रिल्ससोबत केलेल्या मॅन व्हर्सेस वाईल्ड शोचे प्रसारण झाले होते. पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा एपिसोड करण्यात आल्याचा खुलासा सत्ताधाऱ्यांनी दिला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाकडाचे महत्त्व बेयर गिल्सला समजावून सांगितले होते. त्या व्हिडिओतील एक तुकडा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओचा दाखला देऊन, 'आरे कॉलनीत काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

मोदींचे आवाहन आणि पर्यावरण
गणेशोत्सवापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद् घाटन केले होते. त्यावेळी पर्यावरणाचा संदेश देताना, पंतप्रधान मोदींनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा तसेच समुद्रातील प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. पण, पंतप्रधान मोदी पर्यावरणाचा संदेश देताना, आरेच्या वृक्षतोडीवर सोयीस्कर गप्प असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.