
मुंबई: मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अंधेरी (पश्चिम) येथे बीएमसीच्या के/वेस्ट वॉर्डमधील एका निरीक्षकासह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर व राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तक्रारदार ६० वर्षीय महिलेच्या दुकानावर बीएमसी अॅक्ट १८८८ अंतर्गत कारवाईची धमकी देऊन लाच मागितल्याचा आरोप आहे.