Mumbai Accident: बसने दिली रिक्षाला धडक, एकाचा मृत्यू

Mumbai : पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Accident: बसने दिली रिक्षाला धडक,  एकाचा मृत्यू
Mumbai Accident: बसने दिली रिक्षाला धडक, एकाचा मृत्यू sakal
Updated on

Latest Mumbai News: भाईंदर पश्चिमेकडील उत्तन मार्गावर डोंगरी परिसरात मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन बसने रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक दांपत्यासह असलेला अडीच वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे.

मुर्धा गावात राहणारे राजभर कुटुंब रविवारी रात्री रिक्षाने उत्तनला जात होते. डोंगरी येथील वळणावर त्यांच्या रिक्षाला महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिली. अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com