esakal | साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

Mumbai : साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - साकिनाका येथे राहणार्‍या एका तरुणीच्या विनयभंगप्रकरणी अल्ताफ हुसैन अब्दुल हुसैन नावाच्या एका आरोपीस कर्नाटक येथून साकिनाका पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले आहे. तक्रारदार तरुणी ही तिच्या आईसोबत साकिनाका परिसरात राहते. ती घाटकोपर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तिची आई एका हॉटेलमध्ये रिसेपशीन्स म्हणून कामाला आहे. २७ फेब्रुवारीला तिला एका अज्ञात व्यक्तीने तिच्या मोबाईलवर फोन केला होता.

यावेळी त्याने तिच्याशी अश्‍लील संभाषण सुरु केले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने फोन बंद केला. त्यानंतर तिला याच मोबाईल क्रमांकावरुन सतत कॉल येत होते. प्रत्येक वेळेस समोरील व्यक्ती तिच्याशी अश्‍लील संभाषण करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आहे असे बोलत होता. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या व्यक्तीने तिच्या आईसोबतही अशाच प्रकारे अश्‍लील संभाषण करुन तिचा विनयभंग केला होता. २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत त्याने अनेकदा त्यांना कॉल करुन त्यांच्याशी अश्‍लील संभाषण करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: Pune : प्राप्तिकर विभागाचा तपास संपल्यानंतर पुराव्यांसह भूमिका मांडणार

या घटनेने त्या दोघीही कंटाळून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच सात महिन्यानंतर अल्ताफ हुसैन या २४ वर्षांच्या तरुणाला कर्नाटक येथील अमृतपल्ली परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत अल्ताफ हुसैन हा मूळचा आसामच्या गुवाहाटीचा रहिवाशी असून कर्नाटकमध्ये तो चालक म्हणून कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला तक्रारदार तरुणीचा मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यानंतर तो तिच्यासह तिच्या आईशी अश्‍लील संभाषण करीत होता. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

loading image
go to top