esakal | 'मुंबई-अहमदाबाद' महामार्गावरील समस्या; उद्या रास्ता रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

'मुंबई-अहमदाबाद' महामार्गावरील समस्या; उद्या रास्ता रोको आंदोलन

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : मुंबई - अहमदाबाद (Mumbai-Ahmadabad) राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) खड्डे आणि सतत होणारी वाहतूक कोंडी (traffic Jam) यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या महामार्गाचे व्यवस्थापनात हलगर्जीपणा करण्याऱ्या आयआरबी (IRB) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या विरोधात श्रमजीवी संघटना उद्या 7 सप्टेंबर रोजी या राष्ट्रिय महामार्गावर एकाचवेळी तब्बल 14 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन (Strike) करणार आहे.

हेही वाचा: 'KDMC' च्या पाठबळामुळे अनधीकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप

उद्या मंगळवारी हे आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी होणार आहे. यात वसई तालुक्यात ससुनवघर, चिंचोटी, शिरसाड , पेल्हार, सकवार खानिवडे टोल नाका, पालघर तालुक्यात वराई फाटा, मस्तान नका, चिल्लार फाटा, सोमटा, डहाणू तालुक्यात दापचरी, तलासरी तालुक्यात आमगाव आणि अच्छाड या ठिकाणी करणार करणार आहोत अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिली आहे.

तसेच सदर रास्ता रोको आंदोलनाबाबत संघटनेने आयआरबी कंपनी प्रशासनाला तसेच, पोलिस प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी आय आर बी च्या प्रतिनिधींनी हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top