
Maharashtra News: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनी व्यक्त केला. महापे येथे सुरू असलेल्या बोगद्याची शनिवारी त्यांनी पाहणी केली.
मुंबई-अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेनच्या मार्गावर २१ किलोमीटर अंतराचा एक जलभुयारी मार्ग आहे. समुद्राच्या खालून जाणारा देशातील हा पहिला मार्ग असून, प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ठाणे खाडीच्या खालून जाणाऱ्या बोगद्याचा सात किलोमीटरचा भाग हा महापे येथे संपतो. यापैकी महापे येथील दोन किलोमीटरच्या कामाची वैष्णव यांनी पाहणी केली.