Mumbai : पश्चिम रेल्वेने चार सुपरफास्ट विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवली ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे प्रवास

Mumbai : पश्चिम रेल्वेने चार सुपरफास्ट विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवली !

मुंबई - रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चार सुपरफास्ट विशेष गाड्यांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,

ट्रेन क्रमांक ०२२०० वांद्रे टर्मिनस - वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी) साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (प्रत्येक शनिवारी) १ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०२१९९ वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी) - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर गुरुवारी) २९ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०१९०६ अहमदाबाद - कानपूर सेंट्रल साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर मंगळवारी) २७ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०१९०५ कानपूर सेंट्रल - अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर सोमवारी) २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०४१६६ अहमदाबाद - आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर गुरुवारी) २९ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०४१६५ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर बुधवारी) २८ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०४१६८ अहमदाबाद - आग्रा कॅंट साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर सोमवारी) २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०४१६७ आग्रा कॅंट – अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (दर रविवारी) २५ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.