मुंबईत तीन दिवस हवेची पातळी खालावली, संपूर्ण शहरात खराब हवेची नोंद

मुंबईत तीन दिवस हवेची पातळी खालावली, संपूर्ण शहरात खराब हवेची नोंद

मुंबई: मुंबईतील हवेची पातळी सातत्याने खालावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हवेचा निर्देशांक 310 एक्यूआय नोंदवण्यात आला असून अतिशय वाईट हवा सध्या मुंबईकर अनुभव आहेत.

मुंबईसह राज्यात सध्या थंडी अनुभवायला मिळत आहे.  मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील हवा अतिशय प्रदूषित झाली आहे. सफर या संस्थेने पुन्हा एकदा मुंबई संपूर्ण शहराची हवा अतिशय वाईट नोंदवली आहे. सोमवारी 310 ऐक्यूआयची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेत पुणे संपूर्ण शहराची हवा गुणवत्ता निर्देशांक 106 ऐक्यूआय नोंदवण्यात आला असून मध्यम दर्जा नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबईत सातत्याने होणारी बांधकामे, खाणकामे, शिवाय कारखान्याचा धूर अशा सर्व प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांचा फैलाव कमी झाला होता. पण आता हळूहळू सर्व पुन्हा कार्यरत झाले आहे. याचा परिणाम सातत्याने हवेचे प्रदूषण वाढवण्यावर होत आहे. 

नवी मुंबईकरांनो काळजी घ्या

मुंबईसह नवी मुंबई ही मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित झाली आहे. 'सफर' संस्थेने नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार, मुंबई पूर्ण शहरात हवेचा वाईट दर्जा नोंदवण्यात आला आहे.  एकट्या नवी मुंबईत हवेचा एक्यूआय 369 नोंदवण्यात आला आहे. पीएम 2.5 हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद करण्यात आली आहे. त्यातून जास्तीत श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. 

भांडूप, - 114 एक्यूआय पीएम 10 मध्यम 
कुलाबा - 204 एक्यूआय पीएम 2.5 वाईट 
मालाड - 322 एक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट
माझगांव - 297 एक्यूआय पीएम 2.5 वाईट 
वरळी - 132 एक्यूआय पीएम 2.5 मध्यम
बोरीवली - 242 एक्यूआय पीएम 2.5 वाईट
बीकेसी - 204 एक्यूआय पीएम 2.5 वाईट
चेंबूर - 309 एक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट
अंधेरी - 320 एक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट 
नवी मुंबई -369 एक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट 

मुंबईतील सर्वाधिक प्रदूषिण नवी मुंबई परिसरात असून हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट 369 नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ मालाड, चेंबूर आणि अंधेरी मध्येही अतिशय वाईट स्वरुपाच्या हवेची नोंद झाली आहे. त्यांचाही गुणवत्ता निर्देशांक 300 च्या वर नोंदवण्यात आला आहे.  भांडूप आणि वरळीमध्ये मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणाची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 114 आणि 132 नोंदवण्यात आला आहे. 

गेल्या तीन दिवसांत नोंदवण्यात आलेला एक्यूआय

23 जानेवारी या दिवशी - 311 एक्यूआय 
24 जानेवारी - 320 एक्यूआय 
25 जानेवारी - 310 एक्यूआय 

हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर) चे संचालक गुफरन बॅग म्हणाले की, धूलिकण जमिनीलगत राहत असल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसते. सध्या मुंबईत अतिशय थंड वातावरण आहे, त्यामुळे हवेतील कण वातावरणात साचून राहतात. हवेत उपस्थित प्रदूषक बाहेर पडण्यास सक्षम नसतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता अतिशय वाईट आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai air level declining index recorded 310 AQI for the last three days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com