Mumbai Air Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या : मुंबई हवेचा दर्जात सुधारणा नाहीच!

mumbai
mumbai sakal

Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेचा दर्जा अजूनही खालावला असल्याचे समोर येत आहे. सकाळी धुरके आणि दुपारी उन्हाचे चटके असे वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत. परिणामी आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दोनशे गुणवत्ता निर्देशांकामुळे चेंबूरच्या हवेची सर्वाधिक प्रदूषित अशी नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईचा एक्यूआय १२७ होता. हवेचा दर्जा मध्यम आणि पीएम दहा नोंदला गेला.

मुंबईच्या काही ठराविक आणि प्रमुख ठिकाणी हवेचा स्तर बिघडला आहे. प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे.

वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत आहे. त्यामुळे नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या वातावरणात सकाळी गारवा जाणवत असला, तरी हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक १२७ पीएम दहापार गेल्याचे समोर आले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवणाऱ्या ‘सफर’ संस्थेने मुंबईच्या हवेच्या दर्जाची नोंद ‘मध्यम’ अशी केली आहे.

त्याचा परिणाम श्वसनमार्गास आणि फुप्फुसाला होतो. त्याचप्रमाणे दमा, कर्करोग, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इत्यादी विकार होतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. धुरक्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना अस्थमासारख्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे.

mumbai
Mumbai Dance Bar: मुंबईत बेकायदा छमछम होणार कायमस्वरूपी बंद; पोलीस करणार मोठी कारवाई!

शहर एक्यूआय

वरळी ९९

भांडुप १०६

अंधेरी ११०

मुंबई शहर १२७

माझगाव १२७

बोरिवली १३०

मालाड १३१

कुलाबा १४२

नवी मुंबई १५२

बीकेसी १९०

चेंबूर २००

भरपूर पाणी पिणे कधीही चांगले

श्वसनविकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. हृदयविकाराच्या रुग्णांनी दर्जा खालावलेल्या हवेत फिरणे टाळावे. वातावरणात उष्णता वाढल्याने हवेचे प्रदूषण आणि गरमीमुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स कमी होऊन मूत्रपिंड आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. सरबत, लिंबू-पाणी, नारळपाणी आणि ओआरएस घेत राहणे गरजेचे आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे औषध विभागाचे युनिटप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

mumbai
Mumbai: मुंबईला छावणीचं स्वरुप! दसरा मेळाव्यामुळे 12 हजार पोलिसांची कडेकोट सुरक्षा, 'अशी' असेल पार्किंगची व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com