Mumbai: मुंबईला छावणीचं स्वरुप! दसरा मेळाव्यामुळे 12 हजार पोलिसांची कडेकोट सुरक्षा, 'अशी' असेल पार्किंगची व्यवस्था

दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता 12000हून अधिक पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आला आहे.
Mumbai: मुंबईला छावणीचं स्वरुप! दसरा मेळाव्यामुळे 12 हजार पोलिसांची कडेकोट सुरक्षा, 'अशी' असेल पार्किंगची व्यवस्था

Mumbai Police:महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार हे पाहता मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. तर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटातर्फे मेळावा घेण्यात येणार आहे. हे दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता 12000हून अधिक पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आला आहे.

12000 पोलिसांची तैनाती

मुंबईत दोन ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्भूमीवर 6अपर पोलीस आयुक्त. डीसीपी आणि 15-16 पोलीस उप आयुक्त , 45 सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच 2493 पोलीस अधिकारी ,12449 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे 1500 कर्मचारी , होमगार्डचे 1000 जवान, 20 क्विक रिस्पॉन्स टीम, 15 बॉम्ब शोधक आणि निकामी पथके तैनात करण्यात आली आहेत .

वाहतूक पोलिसांची तयारी

शिवसेनेच्या दादर येथील शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक निर्बंधांबाबत सूचना जारी केल्या आहेत.ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुक कोंडी पाहता पोलिसांनी बीकेसी, दादर आणि माहीममध्ये गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत.

पार्किंगची व्यवस्था

पश्चिम आणि उत्तर मुंबईतील शिवसैनिक आणि इतरांना घेऊन जाणाऱ्या बसेस सेनापती बापट मार्ग आणि कामगार मैदानावर उभ्या केल्या जातील, तर नवी मुंबई आणि ठाणे येथून येणाऱ्या बसेस फाईव्ह गार्डन्स, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड येथे उभ्या केल्या जातील अशी माहिती मिळत आहे.इंडिया बुल्स फायनान्स, इंडियाबुल्स वन सेंटर आणि कोहिनूर स्क्वेअर येथे कार पार्क केल्या जातील. (Latest Marathi News)

Mumbai: मुंबईला छावणीचं स्वरुप! दसरा मेळाव्यामुळे 12 हजार पोलिसांची कडेकोट सुरक्षा, 'अशी' असेल पार्किंगची व्यवस्था
Lalit Patil Case : नाशिकच्या गिरणा नदीपात्रात सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज! मध्यरात्रीपासून अंडरवॉटर शोधमोहिम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com