
Mumbai Latest News: शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. दक्षिण मुंबईत हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे, तर कुलाबा आणि भायखळ्यात हवेचा स्तर धोकादायक नोंदवण्यात आला आहे. सध्या मुंबईत हवेचा स्तर १८८ असून मध्यम श्रेणीत याची नोंद होते. वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी हिवाळ्यात मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही वाईट झाली होती. त्यामुळे दरवर्षी मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मुंबईत थंडीचा जोर वाढला आहे; मात्र त्यासोबतच प्रदूषणाचाही कहर झाला आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक हवेचा स्तर घसरला असून, कुलाबा आणि भायखळ्यातील हवेचा स्तर तर धोकादायक स्थितीवर पोहोचला आहे. कुलाबा येथे ३१४ आणि भायखळा ३०६ आणि चेंबूर येथे ३०० हवा गुणवत्ता निर्देशांकासह (एक्यूआय) अतिशय धोकादायक हवेचा स्तर नोंदवला आहे.