पुस्तकातून लपवून अमेरिकन डॉलर्सची तस्करी; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dollars Smuggling

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

Mumbai Crime : पुस्तकातून लपवून अमेरिकन डॉलर्सची तस्करी; आरोपी अटकेत

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. परदेशी नागरिकांनी पुस्तकांच्या पानांमध्ये अमेरिकन डॉलर लपवून आणले होते. यासोबतच त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपात 2.5 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. दोन्ही परदेशी प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

माहितीनुसार, 22 आणि 23 जानेवारी रोजी मुंबई विमानतळ कस्टमने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक केली आणि पुस्तकाच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले अमेरिकन डॉलर्सआणि पेस्टच्या स्वरूपात 2.5 किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून 4.54 कोटी रुपयांचे पेस्ट स्वरूपात 8.230 किलो सोने जप्त करण्यात आले. माहितीनुसार 17 जानेवारी रोजी दुबईहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांद्वारे पेस्टच्या स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी केली जात असल्याची विशिष्ट गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.त्यावर कारवाई करत 8 किलो सोने जप्त करण्यात आले होते.