esakal | मुंबई : बुधवारपासून टर्मिनस 1 सुरू; विमान प्रवाशांना दिलासा | Mumbai Airport
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Airport

मुंबई : बुधवारपासून टर्मिनस 1 सुरू; विमान प्रवाशांना दिलासा

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : सणासुदीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळावर (CSMT Airport) गेल्या आठवड्यात अचानक देशांतर्गत विमान प्रवाशांची (Flight commuters) गर्दी वाढली होती. टर्मिनस 1 (terminus one) बंद असल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाण होणाऱ्या टर्मिनस 2 वर अचानक प्रवाशांच्या तुडुंब गर्दीमुळे कोविड 19 च्या नियमांचे (corona rules) सुद्धा उल्लंघन सुद्धा झाले होते. ही परिस्थिती मुंबई सह देशभरातील अनेक विमानतळावरून दिसून आली होती. मात्र, आता मुंबईच्या विमानतळावरील (Mumbai airport) काही महिन्यांपासून बंद असलेले टर्मिनस 1 बुधवार (Wednesday) पासून सुरू करण्यात आल्याने विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: कुलगुरुंनी महागाड्या गाड्या घेतल्या असतील तर माहिती घेऊ - उदय सामंत

वाढत्या कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता आणि प्रवासी घटल्याने विमान प्रशासनाने यापूर्वीच टर्मिनस 1 बंद केले होते. तर टर्मिनस 2 वरून आंतरराष्ट्रीय आणि काहीप्रमाणात देशांतर्गत सेवा सुरू होत्या. दरम्यान दुसरी कोरोचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर विमान प्रवाशांमध्ये वाढ झाली होती. दरम्यान 20 ऑक्टोबरपासून टर्मिनल एक खुले करण्याची घोषणा सुद्धा विमान प्रशासनाने केली होती.मात्र, गेल्या आठवड्यात अचानक विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने विमानतळ प्रशासनाने 13 ऑक्टोबरपासूनच मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 वाहतुकीस खुले करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

बुधवारी दिवसभरात 70 विमानांनी टर्मिनल एकवरून ये-जा केली. त्यात गो फर्स्ट आणि स्टार एअरच्या विमानांचा समावेश होता. त्यामुळे टर्मिनल दोनवरील बराच भार कमी झाला. 30 ऑक्टोबरपासून इंडिगो 16 ऑक्टोबरला एअर एशिया आणि 30 ऑक्टोबरपासून इंडिगोची काही विमाने येथून उड्डाण करणार असल्यामुळे हा टर्मिनल दोनवरील प्रवाशांचा भार आणखी कमी करण्यास मदत होणार असल्याचे विमानतळ प्रधासनाने सांगितले.

loading image
go to top