
Mumbai Gold Scam : कोणी कपड्यात लपवलं, कोणी टॉयलेटमध्ये; विमानतळावरून अडीच कोटींचं सोनं जप्त!
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने जवळपास अडीच कोटी रुपयांचं सोनं आज जप्त केलं आहे. हे सोनं कपड्यांखाली, विमानाच्या टॉयलेटमध्येही लपवून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कस्टम विभागाने एकूण ४,७१२ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. दोन प्रकरणात हे सोनं जप्त करण्यात आलं आहे. यातलं १,८७२ ग्रॅम सोनं हे कपड्यांखाली लपवून ठेवलं होतं. तर २.८४० ग्रॅम सोनं विमानाच्या टॉयलेटमध्ये लपवून ठेवलं होतं. या सोने तस्करी प्रकरणी कस्टम विभागाने तिघांना अटक केली आहे.
हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटने १.१७ कोटी रुपयांचं अडीच किलो सोनं जप्त केलं होतं. या प्रकरणी दक्षिण मुंबईतला रहिवासी असलेल्या एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे.