Sat, March 25, 2023

CNG Rate : मुंबईकरांना दिलासा! सीएनजीच्या दरात कपात, जाणून घ्या नवे दर
Published on : 31 January 2023, 2:09 pm
सामान्यांना दिलासा देणारी अशी ही बातमी आहे. मुंबई आणि उपनगरात सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त झाला आहे. 87 रुपये प्रतीकिलोने आता सीएनजी मिळणार आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
तर दुसरीकडे सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत होता. आता पहिल्यांदाच सीएनजीचा दर कमी करण्यात आला आहे. महानगर गॅसच्या किमती लागू करण्यात आल्या आहेत. 87 रुपयांनी मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये आता सीएनजी मिळणार आहे. यामुळे मोठा दिलासा रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना मिळणार आहे.
सीएनजीच्या या दर कपतीमुळे सर्वाना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सीएनजीच्या दरात वाढ होत होती. आता दर कपात करण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.