

Mumbai Demolition Scare: Part of Building Collapses in Andheri During Redevelopment Work
esakal
मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम विभागातील वर्सोवा सात बंगला परिसरात पुनर्विकास प्रकल्पासाठी सुरू असलेल्या इमारतीच्या डेमोलेशन प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पाच-सहा दिवसांपूर्वी तोडकाम चालू असताना इमारतीचा मोठा वरचा भाग अचानक खाली कोसळला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, त्याने शहरभर खळबळ माजवली आहे. सुदैवाने या कोसळण्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरीही संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.