Mumbai : एसी लोकल, मोनो, मेट्रोमध्ये लगेज डब्यांची व्यवस्था करा! मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी

Mumbai News
Mumbai News

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. मात्र, एसी लोकलमध्ये लगेज डबा नसल्याने डबेवाल्यांना मोठा फटका बसत आहे. याशिवाय मोनो आणि मेट्रोमध्ये सुद्धा लगेज डबा नसल्याने भविष्यात डबेवाल्यांना वेळेत डबा पोहचवणे कठीण होणार आहे.

Mumbai News
‘कुकडी’चे आवर्तन अखेर लांबलेच...; लाभ क्षेत्रातील खासदार-आमदारांच्या मौनाने शेतकरी हवालदिल

त्यामुळे मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने वातानुकूलित लोकल आणि मोनो, मेट्रोमध्ये सामान डब्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनकडून करण्यात आली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या धावत आहेत. येत्या काळात सर्वाधिक वातानुकूलित लोकल धावणार आहेत. मात्र, या वातानुकूलित लोकलला सामान डबा नसल्याने डबेवाले, फेरीवाले, अवजड सामग्री घेऊन जाणाऱ्यांना वातानुकूलित लोकलचा वापर करता येत नाही. त्यामुळे डबेवाले, फेरीवाल्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Mumbai News
Video : 'मी काय खाते-पिते याकडे इंदापूरमधले पुरुष लक्ष ठेवून', सुप्रिया सुळे करणार अमित शाहांकडे तक्रार|Supriya Sule

सकाळच्या गर्दीच्यावेळी वातानुकूलित लोकलची संख्या वाढवली, तर त्याचा मोठा फटका डबेवाल्यांना बसू शकतो. सकाळी ९-१० वाजता डबेवाला घरून डबा घेऊन दुपारी १२ वाजेपर्यंत डबा कार्यालयात पोहचवतो. मात्र, यावेळी जर वातानुकूलित लोकलची संख्या वाढवली तर, या लोकलला सामान डबा नसल्यामुळे डबेवाला स्थानकात वेळेत पोहचला तरी वातानुकूलित लोकलने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे वातानुकूलित लोकलमध्ये सामान डबा असावा, अशी मागणी डबेवाल्यांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com