आम्ही 'या' सेवेसाठी 2 रुपये कोरोना अधिभार घेऊ! 'त्यांची' राज्य सरकारकडे मंजूरीसाठी विनंती

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 जुलै 2020

आता मुंबईतील रिक्षा चालकांनी दोन रुपयांचा अतिरीक्त कोरोना सरचार्ज आकारण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी ही रक्कम हवी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. 

 

मुंबई ः कोरोना महामारीमुळे आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अनेक उद्योगांवर झाला आहे. आता मुंबईतील रिक्षा चालकांनी दोन रुपयांचा अतिरीक्त कोरोना सरचार्ज आकारण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी ही रक्कम हवी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. 

आमचाही बँक बॅलन्स आता झिरोवर, हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांची हृदयद्रावक व्यथा -

राज्यात तसेच देशात अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार रिक्षात तीनऐवजी दोनच प्रवासी असतील असे ठरले आहे. राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या काही संघटनांनी रिक्षा चालकांना सुरक्षित स्क्रीनचे वाटप केले आहे. तो रिक्षा चालकांच्या मागे लावला जात आहे. एकंदर 25 हजार रिक्षा चालकांना हे वाटप केले असल्याचे सांगितले जात आहे. 

रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे प्रत्येक ट्रीपमागे दोन रुपये अतिरीक्त घेण्याची मंजूरी देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच वापरण्यात येईल. या रकमेतून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्या दरम्यान सुरक्षित पडदा लावण्यासाठी तसेच प्रवाशांना निर्जंतुक उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर मास्क तसेच कपड्यांच्या स्वच्छतेसाठी अतिरीक्त खर्च होणार आहे. 

जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत शाळेची घंटा बंद! वाचा कोण म्हणतंय

रिक्षा तीन महिने बंद आहेत. आत्ताही काही प्रमाणात सुरु झाल्या आहेत, पण त्यांच्या प्रवासावरही मर्यादा आहेत. अनेक रिक्षाचालक गरीब आहेत. त्यातच तीन महिने उत्पन्न नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती जास्तच बिकट आहे. या परिस्थितीत त्यांना सुरक्षित उपाय अमलात आणणेही आर्थिकदृष्ट्या आव्हान असेल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai auto union demands rs 2 for covid safety