धक्कादायक ! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, तर राज्यात एकूण इतके जण बाधित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

पार्कसाईट पोलिस ठाण्यात कार्यरत 57 वर्षीय पोलिस हवालदाराचा अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.

मुंबई : मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्य झाला. त्यात एक पार्कसाईट पोलिस ठाण्यातील हवालदार व दुसरे वाहतुक पोलिस विभागात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.

नक्की वाचा : आणखीन एक मोठा खुलासा ! असे सापडले होते 'गायब झालेले' अजित पवार....

पार्कसाईट पोलिस ठाण्यात कार्यरत 57 वर्षीय पोलिस हवालदाराचा अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला. ते विक्रोळीतील  टागोरनगर येथे वास्तव्याला होते. त्यांना ताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.  याशिवाय सहार वाहतुक विभागात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत पोलिसाचाही मृत्यू झाला. सध्या राज्यात एकूण 1328 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची  लागण झाली आहे. त्यातील तब्बल 650 पोलिस कर्मचारी हे मुंबई पोलिस दलातील आहे. राज्यात आतापर्यंत 14 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कौतुकाची बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेले 191 पोलिस कर्मचारी कोरोनावर मात करून पून्हा सेवेत रुजूही झाले आहेत. त्यात एका उपायुक्त दर्जाच्या अधिका-याचा समावेश आहे.

मोठी बातमी : महाभयंकर ! इटली नाही हे आहे ठाणे, कोरोनाग्रस्त रस्त्यावरच तडफडत होता, अँब्युलन्स आली तोवर 

नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे बळी 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मुंबईतून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या रक्षणासाठी मुंबई पोलिस दिवस, रात्र रस्त्यांवर गस्त घालत आहे. मात्र लॉकडाऊनबाबत लोक आजही गंभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, मास्कचा वापर न करणे, असे प्रकार सर्रास घडत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. यादरम्यान नागरिकांशी थेट संबंध येत असल्याने त्याची किंमत पोलिसांना चुकवावी लागत आहे.

In Mumbai, because of Corona death two more policemen total of 650 people were affected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai, because of Corona death two more policemen total of 650 people were affected