mumbai bangaluru vande bharat slipper express
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मुंबई ते बंगळूरदरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस गुरुवारी मुंबईत दाखल झाली. आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी शयनव्यवस्था आणि प्रवाशांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सुविधांमुळे ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. येत्या १ नोव्हेंबरला या गाडीचे उद्घाटन होणार असून, ३ नोव्हेंबरपासून नियमित प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या मुंबई ते बंगळूरदरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात. नव्या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे हा प्रवास सुमारे १६ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत सहा ते आठ तासांची बचत होण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि बंगळूर या दोन प्रमुख शहरांदरम्यान वेगवान आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.