

Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper Booking Update First AC Regret Status and Long Waiting Lists in November Travel Dates
esakal
नितीन बिनेकर
मुंबई : दिवाळीच्या सणासुदीच्या काळातच सुरू झालेल्या मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटनानंतर नियमित सेवेला सुरुवात होताच या गाडीच्या आरक्षणासाठी प्रवाशांची पसंती मिळू लागली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक महागडे म्हणजेच ४,४५० रुपये तिकीटदर असलेल्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही अनेक दिवसांसाठी फुल्ल झाले आहे. नोव्हेंबरमधील काही दिवस प्रथम श्रेणीचे आरक्षण 'रिग्रेट' स्थितीत पोहोचले असून, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतही प्रतीक्षा यादी शंभरीपार गेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीतील प्रवासासाठी नव्या वंदे भारत स्लीपरचे आकर्षण वाढल्याचे चित्र आहे.