
Mumbai News: मुंबईकरांना आता बेस्ट बसने प्रवास करताना अधिक खर्च करावा लागणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने आपल्या सर्व AC आणि non-AC बस सेवांच्या भाड्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. २०१९ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे वाढ करण्यात आली आहे.