Mumbai : ह्दयविकाराच्या झटका आल्यास बेस्ट प्रवाशांना मिळणार प्रथमोपचार Initiate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best

Mumbai : ह्दयविकाराच्या झटका आल्यास बेस्ट प्रवाशांना मिळणार प्रथमोपचार

मुंबई : मुंबईत बेस्ट प्रवासादरम्यान प्रवाशांना यापुढे ह्दयविकाराचा झटका असल्याची चिंता करण्याचे कारण नाही. बेस्ट उपक्रमाने हाती घेतलेल्या मोहिमेनुसार यापुढे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही कार्डिओसेरेब्रल रेसुसायटेशन (सीसीआर) चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाशाला प्रवासादरम्यान ह्दयविकाराचा झटका असल्यास त्या प्रवाशाला योग्यवेळी उपचार देण्यासाठीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्याला देण्यात आलेले असेल. त्यामुळे रूग्णालयात नेण्याआधी वेळीच त्या प्रवाशाचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. याबाबतच्या प्रायोगिक तत्वावरील सुरूवात ही बेस्ट उपक्रमाच्या डेपोपासून झाली आहे. 

बेस्टच्या सर्व डेपोमध्ये कर्मचाऱ्यांना (सीसीआर) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठीचे मॉकड्रीलही काही ठिकाणी झाले आहेत. नुकतेच एक मॉकड्रील हे मुंबई सेंट्रल येथे पार पडले. याठिकाणी एका बेस्ट कर्मचाऱ्याला सीसीआर देण्याचा प्रयोगही यावेळी करण्यात आला होता. मुंबईतील २७ डेपोमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामध्ये सीसीआरचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापुढच्या टप्प्यात बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर या कर्मचाऱ्यांनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

जागतिक ह्दय रोग दिनाच्या निमित्ताने बेस्टच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने मध्य मुंबईतील व्होक्हार्ड हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ  डॉ. रवि  गुप्ता तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिंनिधी डॉ. अमोल वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ' स्वस्थ हृदय अभियान ' कार्यक्रम संपन्न झाला. या अभियानांतर्गत बेस्ट कर्मचार्‍यांच्या  इ.सी.जी., रक्तदाब तसेच मधुमेह आदी तपासण्या  व्होक्हार्ड हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आल्या. या प्रसंगी कार्डियो पल्मोनरी रेसासीटेशन  ( सी.पी.आर. ) पद्धतीचे प्रात्यक्षिक  कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले. बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी बेस्ट उपक्रम ही रक्तदाब तपासणी करण्याबाबतचे परिपत्रक काढणारी पहिली संस्था असल्याचे सांगितले.