esakal | महिलांसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

Mumbai : महिलांसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट उपक्रमा मार्फत पुढील आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष बसेस सेवा सुुरु करण्या बरोबरच आणीबाणीच्या परीस्थीतीत मदतीसाठी खास मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे.बेस्टच्या 2022-23 या वर्षिच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.त्याच बरोबर कॉर्पोरेट नोकरदारांसाठीही विशेष बस सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बेस्टचा अर्थसंकल्प आज बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांना सादर केला आहे.या अर्थसंकल्पात तेजस्वीनी बसेसच्या धर्तीवर गर्दीच्या मार्गावर वर्दळीच्या वेळी महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्याच बरोबर विमानतळ ते वांद्रे कुर्ला संकुल आणि नरीमन पॉईंट अशी वातानुकूलीत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.अशी घोेषणा आज महाव्यस्थापकांनी केली.त्याच बरोबर विविध कंपन्या,कॉल सेंटर आणि शाळांच्या मागणीनुसारही बसेस सुविधा पुरविल्या जाणार आहे.उत्पन्न वाढीसाठी बेस्ट आता नवे पर्याय शोधत आहे.

प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी बेस्ट प्रशासन मोबाईल ॲप्लिकेशन तयार करत आहे.त्यात विशेष बटण ठेवण्यात येणार आहे.आणीबाणीच्या परीस्थीतीत माहिला प्रवाशांना मदत पोहचविण्यासाठी त्याची मदत होणार आहे.असेही महाव्यस्थापकांनी स्पष्ट केले.त्याच बरोबर सीसीटीव्ही कॅमरेही बसविण्यात येत असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वपुर्ण निर्णय घेतले जात आहेत.

सध्या बेस्टच्या भाड्याच्याच लहान बसेस जास्त प्रमाणात धावत आहे.त्यात आसने कमी असल्याने प्रामुख्याने महिला प्रवाशांना जास्त मनस्ताप भोगावा लागत आहे.अगदी दाटीवाटूत प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवांची संख्या वाढल्यास त्याचा मोठा दिलासा महिलांना मिळणार आहे.यासाठी मार्गाची निरीक्षण करुन बसेसची संख्या व वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे.

loading image
go to top