esakal | नियतीचा क्रूर खेळ, अंत्यसंस्कारासाठी बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना काळाने गाठलं, मुंबईतील घटना | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

bike accident 1.jpg

नियतीचा क्रूर खेळ, अंत्यसंस्कारासाठी बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना काळाने गाठलं

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: पवईमध्ये (powai) रविवारी एका दुचाकीचा अपघात झाला. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या दोघांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक आहे. भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने बाईकला धडक (bike accident) दिली. मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली बेदरकारपणे वाहन चालवल्याच्या आरोपांखाली पवई पोलिसांनी टेम्पो चालक भुरीलाल पालीवालला (३७) अटक केली आहे.

राजू जैन (३२) आणि गणेशलाल जैन (६६) दोघे बाईकवरुन कुटुंबातील एका सदस्याच्या अत्यंविधीसाठी चालले होते. त्यावेळी पवई तलावाजवळ संध्याकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकलवरुन दोघे घरातून निघाल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: शाहरुखचं टेन्शन वाढलं, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला

टेम्पोच्या धडकेनतंर बाईकवरुन फेकल्या गेलेल्या राजू आणि गणेशलाल दोघांना गंभीर दुखापत झाली होती. जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

loading image
go to top