Mumbai: दूध व्यवसायाच्या आड रेल्वे तिकिटांचा काळा बाजार

आरपीएफ क्राईम ब्रॅंचची कारवाई
 Black market train tickets underguise milk
Black market train tickets underguise milksakal

डोंबिवली- डोंबिवली स्टेशन परिसरात दूध व्यवसायाच्या आडून काळा बाजार चालत असल्याची घटना उघडकीस आली आहे. आरपीएफ क्राईम ब्रॅंचने

कारवाई करत एका दलालाला अटक केली आहे. सुनील दुबे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 1 लाख 68 हजार रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानक हे अत्यंत रहदारीचे स्थानक असून येथून दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे देखील स्थानकातून बुकिंग होते. प्रवाशांची संख्या जास्त असल्याचा फायदा दलाल घेत असून या स्थानक परिसरात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार देखील चालतो.

 Black market train tickets underguise milk
Mumbai City : मायानगरी! लोकं मुंबईच्या प्रेमात का पडतात?

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या दूध डेरीत 500 ते 1000 रुपये प्रति सीट कमिशनवर रेल्वे तिकिटे विकली जात असल्याचे माहिती आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेने शनिवारी डोंबिवली स्टेशन परिसरात छापा टाकत कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार डेअरीवर छापा टाकत डेअरी चालवणाऱ्या सुनील दुबे याला अटक करण्यात आलीआहे.

 Black market train tickets underguise milk
Pune City : विक्रम-वेताळ आणि शहर बेताल!

त्याच्याकडून आरपीएफने 1 लाख 68 हजार रुपये किमतीची 94 रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. या तिकिटावर प्रवास करणे बाकी होते. सुनील दुबे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे या व्यवसायात साथ देणाऱ्यांचा आरपीएफ शोध घेत आहे.

या कारवाई मुळे दुग्ध व्यवसायाच्या आड होणारी रेल्वे तिकिटांची विक्री उघड झाली आहे. अशाच पद्धतीने आणखी या परिसरात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार होत असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस सर्व अंगाने याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com