
मुंबईत 10 हजार युनिट तर राज्यात 60 हजार युनिटहून अधिक रक्ताचा साठा उपलब्ध असल्याने रक्ताचा तुटवडा दूर झाला आहे.
मुंबई: कोविड काळात रक्त संकलन कमी झाले होते. त्यामुळे थँलेसेमिया रुग्णांना रक्तासाठी अनेकदा वणवण करावी लागली. मात्र सध्या मुंबईत 10 हजार युनिट तर राज्यात 60 हजार युनिटहून अधिक रक्ताचा साठा उपलब्ध असल्याने रक्ताचा तुटवडा दूर झाला आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक रक्तदानासाठी पुढे येत नसल्याने रक्तदानाचे प्रमाण घटले होते. मात्र यंदा मुंबईतील गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आरोग्योत्सवावर भर दिला. अनेक रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान झाले. त्यामुळे आवश्यक रक्तसाठा तयार झाला.
रक्तदात्यांनीच आयोजक बनून पुढे या आणि लोकांना रक्तदानास प्रोत्साहन द्या असे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वतः रक्तदान करुन रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेण्यास सुरुवात केली.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सामाजिक संस्था आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदानासाठी वारंवार आवाहन करण्यात येत होते. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल, अप्लास्टिक ॲनेमिया या रक्त संदर्भात आजार असणाऱ्याना रक्ताची गरज असते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे अनके जण रक्तदान शिबिरात सहभाग घेत नाहीत. मात्र अनेक गणेशोत्सव मंडळानी पुढाकार घेत यंदा आरोग्योत्सव थीम राबवली आणि मार्चमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मदत झाली. रक्तदात्यांनी चांगला प्रतिसादही दिला.
हेही वाचा- Corona Vaccination: मुंबईत आजपासून पुन्हा कोरोना लसीकरणास सुरुवात
सर्व सामान्य नागरिकांसह सामाजिक संस्थांनी केलेल्या रक्तदानामुळे तुटवडा दूर झाला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून रक्तदान शिबिरे घ्यावीत. सध्या मुंबईसह राज्याला पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे.
डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
रक्तपेढ्या रक्तसाठा (ब्लड युनिट्स)
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai blood shortage problem sloved Rajesh tope